बारामती: दि २५.
संपादक – अनिकेत कांबळे
बारामतीत अजित पवारांच्या संकल्पनेतून उभा राहिलेलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती व आसपासच्या परिसरातील जनतेला चांगल्या सुख सुविधा मिळाव्यात हा त्या मागचा प्रमुख हेतू होता. परंतु अनेक दिवसापासून तेथील रुग्णांची गैर सोय होत असल्याचे निदर्शनास आले. आणि अशातच महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात अचानक भेट दिली. त्यामुळे तेथील अस्तव्यस्त पडलेल्या अवस्थेत काही वस्तू त्यांना अढळून आल्या. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या ॲक्शन मोडवर आल्याचा पाहिला मिळाले त्यांनी तातडीने या शासकीय महाविद्यालयातील रुग्णालय येथील अधिष्ठाता आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तत्कालीन बदली झालेले प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के तसेच शल्यचिकित्सा शास्त्र प्राचार्य डॉ. मंजुषा लिटके यांच्या कार्यकाळात महाविद्यालय आणि रुग्णालया मध्ये रुग्णाची गैरसोय झाल्याने अनेक रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागला. याचीच दखल घेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या अधिकाऱ्यांची उचल बांगडी केल्याचे समोर आले आहेत.या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नवीन प्रशासकीय अधिकारी शरीर रचना शास्त्र डॉ . अंजली पाटील यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
या बदल्यांमुळे येणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे रुग्णालयामध्ये आता रुग्णांना वेळेत उपचार आणि रुग्णालयातील स्वच्छता ही चांगल्या पद्धतीने होणार असे संकेत मिळत आहेत. इथून पुढच्या काळामध्ये रुग्णालय व महाविद्यालयात अस्वच्छता तसेच रुग्णांना उपचार वेळेत न मिळाल्यास अशाच पद्धतीने कारवाई अधिकाऱ्यावर होणार का..? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.







