संपादक – अनिकेत कांबळे
बारामती: (दि.२५ ऑगस्ट)
नटराज नाट्य कला मंडळ, बारामतीच्या वतीने आगामी ‘द बॉम्बे ब्लड’ या चित्रपटाच्या निमित्ताने बारामतीमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मीडिया प्रतिनिधींची एक विशेष बैठक पार पडली. नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरणदादा गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये संस्थेची माहिती तसेच आगामी ‘द बॉम्बे ब्लड’ या प्रकल्पाची सविस्तर माहिती ॲड. अमर महाडिक आणि ॲड. प्रिया गुजर यांनी उपस्थितांसोबत शेअर केली. चित्रपटाच्या प्रचारासाठी आणि स्थानिक पातळीवर माहिती पोहोचवण्यासाठी हा संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरला.
या मध्ये प्रामुख्याने अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली डिजिटल शक्ती आणि एकत्रित उद्देश: बारामतीमधील विविध घडामोडी, कला, संस्कृती आणि सकारात्मक बाबी हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल ताकद एका सामायिक उद्देशासाठी एकत्र आणणे गरजेचे आहे.
“Bremen to Baramati” संकल्पना: नटराज नाट्य कला मंडळ आणि The Bombay Blood टीमच्या पुढाकाराने एक अनोखा सांस्कृतिक सेतू उभारण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.
‘The Bombay Blood’ इंडो-जर्मन चित्रपट: या सांस्कृतिक सेतूचा पहिला टप्पा म्हणजे हा चित्रपट असून, याचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मिती श्री. गौरव ठाकूर यांनी केली आहे आणि त्याचे चित्रीकरण मुंबई, पनवेल व जर्मनी येथे झाले आहे.
स्थानिक विद्यार्थ्यांना संधी: जर्मनीमध्ये निर्माण झालेली ही कलाकृती बारामतीशी जोडली गेल्यामुळे, येथील मीडिया व कम्युनिकेशन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आशय निर्मिती, डिजिटल कंटेंट आणि चित्रपटाच्या प्रसारामध्ये थेट काम करण्याची संधी मिळणार आहे.

‘Digital Baramati’ ची व्यापक संकल्पना: हा उपक्रम केवळ चित्रपटाच्या प्रमोशनपुरता मर्यादित नसून, याद्वारे डिजिटल इन्फ्लुएंसर्स, कंटेंट क्रिएटर्स, विद्यार्थी व कलाकारांना एकत्र आणून “Digital Baramati” ही संकल्पना उभी करायची आहे.
बारामतीची ओळख जागतिक स्तरावर नेणे: बारामतीमधील कोणतीही प्रतिभा किंवा उपक्रम देश-विदेशापर्यंत आणि महाराष्ट्र-भारताबाहेर पोहोचवणे हा या संपूर्ण प्रवासाचा मुख्य उद्देश आहे.
नटराज नाट्य कला मंडळाची दीर्घकालीन वाटचाल: ही बैठक केवळ एका चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी नसून, नटराज नाट्य कला मंडळाच्या ४७ वर्षांच्या सांस्कृतिक प्रवासाला डिजिटल युगाची ताकद जोडून बारामतीसाठी दीर्घकालीन सकारात्मक कार्य करण्याची सुरुवात आहे.
या बैठकीत बारामतीमधील विविध प्रसिद्ध सोशल मीडिया पेजचे चालवणारें आणि मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
अनिकेत दिलीप कांबळे (नव महाराष्ट्र न्यूज – मीडिया)
श्रेयश उमेश दुबे (बारामतीचा आवाज – मीडिया)
शिवतेज नवनाथ यादव (Aesthic Baramati, Baramati Vibe)
सागर जगदाळे (Baramati Diaries)
अमित रणदिवे (Exploring Baramati)
साक्षी शिंदे (Travel with Baramati)
यशराज शिंदे (Travel with Baramati)
पवन राऊत (Baramaticity Page)
साहिल व्ही. आटोळे (baramati_official_page








