क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप.


  • बारामती दि.१३

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते प्यायलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही” या विचारांचा वारसा जपत सत्यशोधक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम पार पडला.

या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. “गरजू विद्यार्थी शिकले पाहिजेत” हा एकच ध्यास मनात ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजक नेहाल दामोदर आदित्य मोहिते यांनी केले

कार्यक्रमाची सुरुवात विशेष पद्धतीने करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस पदी निवड झालेल्या कु. आयेशा शेख हिचा जाहीर सत्कार करून उपस्थितांनी तिच्या यशाचे कौतुक केले. तिच्या यशाने परिसरातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली.

या कार्यक्रमाला नगरीचे नगरसेवक जयसिंग (बबलू) देशमुख, बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव काळूराम चौधरी, सामाजिक कार्यकर्ते पिंटू भाऊ गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!