बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्कमध्ये स्व. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व विशेष लेखन उपक्रमाचा शुभारंभ..!


संपादक – अनिकेत कांबळे

बारामती, दि.(२२ जुलै)  बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्क लिमिटेड येथे स्व. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत भावपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम तसेच *”दादा : माझ्या मनातील प्रेरणा” – स्व. अजित दादा पवार जयंती विशेष लेखन – २०२६* या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  या मध्ये बारामती हाय – टेक टेक्सटाइल पार्क लिमिटेड मधील २५०० कर्मचाऱ्यांच्या सहभाग आहे. खालील प्रमाणे अनेक उपक्रम आहेत.

उपक्रमाचे नाव:

“दादा : माझ्या मनातील प्रेरणा”.                           स्व. अजित दादा पवार जयंती विशेष लेखन – २०२६

लेखनासाठी विषय:                                            १. “स्व. अजित दादा पवार : माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व”*

२. “दादांनी दिलेली शिकवण आणि माझ्या जीवनातील बदल”*

३. “दादांचे स्वप्न – माझी जबाबदारी”*

(समाज, महिला सक्षमीकरण, रोजगार, शिक्षण आणि विकास याविषयी माझे विचार)

 

• निवडक लेखांचे संपादन करून *”दादा : माझ्या मनातील प्रेरणा”* या नावाने स्मरणिका/पुस्तक प्रकाशित करण्यात येईल. अशा प्रकारे हा उपक्रम केवळ स्पर्धा न राहता २५०० कर्मचाऱ्यांच्या भावना, विचार आणि दादांप्रती आदर यांचा विचार करून नवीन उपक्रम राबवत अजित पवारांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून *मा. श्री. संतोष कटारिया साहेब* संचालक, बारामती हाय – टेक टेक्सटाइल पार्क आणि मालक – पेपरमिंट कंपनी तथा President, The Clothing Manufacturers Association of India – CMAI) यांनी उपस्थित राहून स्व. दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

संतोष कटारिया – चौकट

स्व. अजित दादा पवार यांनी समाजहित, उद्योग, रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि विकासासाठी केलेले कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या अधिक प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजेत.* त्यांनी बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्कमधील सर्व कर्मचारी वर्गाला *”दादा : माझ्या मनातील प्रेरणा” * या विशेष लेखन उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन दादांविषयीच्या आपल्या भावना, आठवणी आणि प्रेरणादायी विचार लेखनातून व्यक्त करण्याचे आवाहन केले.

या उपक्रमांतर्गत टेक्सटाइल पार्कमधील *सुमारे २५०० कर्मचारी सहभागी होणार असून, “स्व. अजित दादा पवार : माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व”, “दादांनी दिलेली शिकवण आणि माझ्या जीवनातील बदल” तसेच “दादांचे स्वप्न – माझी जबाबदारी”* या विषयांवर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत लेखन करण्यात येणार आहे. निवडक लेखांचे संपादन करून **”दादा : माझ्या मनातील प्रेरणा” या नावाने स्मरणिका/पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी आपल्या लेखाच्या शेवटी *”दादांसाठी माझा एक संकल्प”* हे एक प्रेरणादायी वाक्यही लिहिणार असून, संबंधित कर्मचारी यांचा फोटो, नाव, कंपनी आणि संकल्प यांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ लेखन स्पर्धा न राहता *२५०० कर्मचाऱ्यांच्या भावना, विचार आणि स्व. दादांप्रती असलेल्या आदराचा ऐतिहासिक वैचारिक दस्तऐवज* ठरणार आहे. याच निमित्ताने बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्क कार्यालय तसेच बारामती सहकारी बँक, टेक्सटाइल पार्क शाखेमध्ये स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक *श्री. खंडू गायकवाड* यांनी केले, तर *आभार श्री. विजय कोकाटे* यांनी केले. यावेळी *श्री. जयदीप तुपे , श्री. नाचेकेत वैद्य, श्री. सुनील पाटील, श्री. अनिल अडवाणी, श्री. कल्पेश सर, श्री. प्रवीण गदादे, श्री. स्वामी सर, श्री. संतोष नलावडे, श्री. मनोज कुलकर्णी, सौ. सोनाली मुनोत  तसेच बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्कमधील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


16
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!