चंद्रमणी नगर येथे आरोग्य सेवेचा उपक्रम यशस्वी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!


बारामती दि.११

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त

चंद्रमणी नगर बौद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच रक्त तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

या उपक्रमास नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला, याबद्दल सर्व नागरिकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले

तसेच या शिबिरासाठी सहकार्य करणारे सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवक, तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेणारे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विशेष आभार सौ. आरती मारुती शेंडगे यांच्या वतीने मानण्यात आले

 


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!