स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम; विद्यार्थ्यांना ज्ञानाची भेट..! शालेय साहित्य वाटप.


दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप..!

संपादक – अनिकेत कांबळे 

बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा क्रमांक १ मधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात या उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन तसेच विविध शालेय साहित्याचे वितरण तसेच खाऊ वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधता येते आणि विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हीच दिवंगत अजितदादा पवार यांना खरी आदरांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

कार्यक्रमास नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक , सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार तसेच शाळेचे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास, शिस्त आणि परिश्रम यांच्या जोरावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्ताविका व आभार सुरज देवकाते यांनी मानले शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


16
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!