बारामती (दि.30) शहरात प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. गुटख्याच्या सेवनामुळे अनेक तरुण आणि नागरिकांना अल्पवयातच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत असल्याने समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाहीचा धडाका चालू आहे. परंतु बारामतीत याला केराची टोपली दिली जात असून. यांच्या वर कार्यवाही कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाने गुटखा विक्रीवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे., खालील ठिकाणी गुटखा विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे: जोगदंड – तांदुळवाडी कदम – कृष्णाई लॉन परिसरसाई वाडेकर – शिवाजी चौक. संबंधित यंत्रणांनी या तक्रारींची चौकशी करून सत्यता पडताळावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.








