दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!


संपादक : अनिकेत कांबळे 

बारामती (दि:३१): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने वतीने (दि २९) रोजी बारामती येथील होमगार्ड कार्यालय परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.

 

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे, नगरसेविका पुनम चव्हाण, नगरसेवक गणेश जोजारे, सोमनाथ गजाकस, विशाल हिंगणे, ॲड. योगेश लालबिगे, बळवंत माने, पत्रकार सुरज देवकाते, निवृत्ती गोरे, हिरामण माने, बालाजी गुळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन केले. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम बारामती शहरासाठी प्रेरणादायी ठरला.


16
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!