बेडरुममध्ये झोपलेल्या असताना आक्रित घडलं, अज्ञाताने विवाहितेला घरात घुसून संपवलं; बारामतीत थरारक घटना?


बारामती (दि.१३) तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेची घरात अज्ञात व्यक्तीने हत्या केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

बारामती तालुक्यातील पणदरे येथे घरातील झोपण्याच्या खोलीत विवाहितेच्या डोक्यात व चेहऱ्यावर अज्ञात हत्यारानं मारहाण करून, तसेच टॉवेलने गळा आवळून खून केल्याची घटना काल शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. वैशाली तानाजी पवार (वय 30, रा. पणदरे) असं हत्या झालेल्या विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी मयत महिलेची सासू रंजना लक्ष्मण पवार (वय 50, रा. खडकआळी, पणदरे) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणदरे गावच्या हद्दीत वैशाली पवार या त्यांच्या राहत्या घरातील झोपण्याच्या खोलीत होत्या. काल शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून हल्ला केला. डोक्यात व चेहऱ्यावर हत्याराने मारहाण केल्यानंतर टॉवेलने गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी काल शनिवारी रात्री साडेनऊपासून आज रविवारी पहाटे अडीचपर्यंत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ हे तपास करीत आहेत. हत्या कोणत्या कारणातून झाली? तसेच आरोपी कोण आहे? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.


18
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!