बारामतीत तरुणाचा खून..! आरोपींना केले गजाआड.


बारामती (दि:१५)

बारामतीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना एक धक्कादायक घटना घडली आहे .बारामती येथील जुना मोरगाव रोडवरील लेंडीपट्टी येथे वेताळ बाबा मैदानावर  रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंधारात दारू पीत बसलेल्या तीन मित्रांमध्ये दारूची नशा जशी चढली तशी शिवीगाळ झाली. शिवीगाळ सुरू झाली आणि त्यातून वाद वाढला आणि एकाने दगड उचलला. मग दोघांनी तिसऱ्या मित्राचा डोक्यात दगड घालून तो मरेपर्यंत दगडाने मारहाण केली.

मिळालेली माहिती अशी की, बारामतीत रात्रीच्या वेळी उशीरा ही घटना घडली.

या घटनेत अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय 20 राहणार बारामती) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी समीर इक्बाल शेख रा.देवळे इस्टेट, बारामती), प्रथमेश राजेंद्र दळवी रा.जगतापमळा, बारामती) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

ही घटना घडल्यानंतर अविनाश लोंढे याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच दोन्ही आरोपींनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आणि पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यांनी पोलिसांना घटना सांगितली. पोलिसांनी तिथेच दोघांना ताब्यात घेतले आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी धनंजय प्रभाकर लोंढे यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 460/2025 BNS-103(1),3 (5) अ.जा.ज.अ.प्र.का.क 3 (1) (r),3(2) (v) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस करत आहेत. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे.

 


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!