दि:(26 जाने) बारामती प्रतिनिधी:
आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती येथील एकता इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज बारामती येथे ७७ वा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नगरसेवक व आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली व उपस्थितांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. अल्ताफभाई सय्यद ( नगरसेवक बा.न प) मा. सुधीर नाना सोनवणे(माजी नगरसेवक) शाळेचे शिक्षकवृंद, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीत सादर केले. या सादरीकरणांनी उपस्थित मान्यवरांसह शिक्षक व पालकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.









