इंदापूर: भवानीनगर येथे शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभा. जानकर – कडूंचा सरकारवर हल्लाबोल…!


भवानीनगर (इंदापूर) येथे झालेल्या शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेत माजी मंत्री महादेव जानकर व माजी आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली.
जानकर म्हणाले, आम्ही पाच माणसांपासून सरकार बदललीत, भल्या भल्याचं सरकार उलटवलं आहे. आता हेही उलटायला वेळ लागणार नाही.

ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हणणारे मुख्यमंत्री आता गप्प आहेत. सोयाबीनला एकराला २२ हजार खर्च येतो, आणि सरकार देते फक्त साडेआठ हजार. नदीकाठची जमीन वाहून गेल्यावर सहा लाख खर्च येतो, मदत फक्त ४७ हजार.

बच्चू कडू म्हणाले, कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघात ऊसाला २८०० रुपये भाव आणि एफआरपी ३५५० रुपये! (लुटणे वाला भी वही और चुनके आने वाले भी वही) दत्ताभाऊ भरणे जर शेतकऱ्यांचे पालक असतील तर ही लूट थांबवली पाहिजे.
ते पुढे म्हणाले दादागिरी सामान्य माणसावर दाखवू नका सरकारवर दाखवा अस देखील हल्ला सरकारवर केला , अजित पवार पैशाचं सोंग जमलं नाही म्हणतात, पण लुटायचं सोंग मात्र चांगलं जमतं. शेतकऱ्यांसाठी जर काही करता येत नसेल तर खुर्ची सोडा.

दोन्ही नेत्यांनी जाती–धर्माच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!