संपादक – अनिकेत कांबळे
अध्यक्षपदी नवनाथ बोरकर तर उपाध्यक्षपदी सागर सस्ते व शिवाजी ताटे, आणि सचिव पदी निलेश जाधव.
बारामती : (दि.१४) पत्रकार संघ बारामती या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक शुक्रवार (दि.14) ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक संघ बारामती येथे संपन्न झाली. या बैठकीत नवीन कार्यकारणी सर्वानुमते घोषित करण्यात आली.
या बैठकीत 2026 ते 2028 या कार्यकालासाठी पुढील प्रमाणे कार्यकारणी सर्वानुमते घोषित करण्यात आली.अध्यक्ष नवनाथ बोरकर,उपाध्यक्ष सागर सस्ते, शिवाजी ताटे,सचिव निलेश जाधव,सहसचिव सुरज देवकाते, कार्याध्यक्ष सौ.शुभांगी महाडिक, खजिनदार स्वप्निल शिंदे,सह खजिनदार प्रशांत कुचेकर यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी सुधीर जन्नू डॉ. विजयकुमार भिसे,सोमनाथ कवडे, तैनूर शेख,दीपक पडकर,दत्तात्रय महाडिक,राजेश वाघ,मन्सूर शेख, संजय भिसे,संतराम घुमटकर, मल्लिकार्जुन हिरेमठ,कृष्णमुर्ती जगताप हे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
पत्रकार संघ बारामती हा नावाजलेला आणि पत्रकारांच्या समस्या अडचणी सोडवणारा पत्रकारांचा संघ म्हणून परिचित आहे.या पत्रकार संघाची वाटचाल यशस्वीरित्या पुढे अविरतपणे चालवण्यासाठी आणि संघ महाराष्ट्रत नावारूपाला आणण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करून पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष नवनाथ बोरकर यांनी यावेळी दिले.









