अहिल्यानगर: ता.१२ राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे सातत्याने मुस्लिम समूदायाच्या विरोधात वक्तव्य करत असून त्यामुळे त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याचं चित्र आहे.
: संग्राम जगताप अजितदादांचे ऐकेनात! आपले दोन-चार जण आत गेले तरी चालेल, पण धर्माच्या रक्षणासाठी मुस्लिमांना उत्तर द्या; जगताप पुन्हा बरळले
Sangram Jagtap Statement : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे सातत्याने मुस्लिम समूदायाच्या विरोधात वक्तव्य करत असून त्यामुळे त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याचं चित्र आहे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांनी (Ajit Pawar) समजावून, नोटीस पाठवूनही संग्राम जगतापांवर (Sangram Jagtap) काहीच परिणाम झाल्याचं दिसत नाही. पक्षाच्या नोटिशीनंतरही त्यांचे मुस्लिम विरोधात वक्तव्यं सुरूच आहे. आताही अहिल्यानगरमध्ये त्यांनी तशाच पद्धतीचं वक्तव्य केलं. आता आपल्याला हा देश, धर्म सुरक्षित ठेवायचा आहे, त्यामुळे आपले पण दोन-चार लोक आत गेले तरी हरकत नाही, पण लोकांना आता प्रत्युत्तर द्या असं जाहीर आवाहन त्यांनी केलं.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिमांकडून कोणतीही खरेदी करू नका अस वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी त्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीसही पाठवली. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अहिल्यानगर इथल्या शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चामध्ये त्यांनी मुस्लिम समूदायाच्या विरोधात पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं.
अहिल्यानगरमध्ये काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात आक्षेपार्ह पत्रक भिरकवल्याच्या निषधार्थ मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सामील झाले.काही दिवसांपूर्वी एमआयएमचे बोकड आपल्या अहिल्यानगरमध्ये आले होते. हे बोकड आले आणि बडबड करून करून गेले. अहिल्यानगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला मग त्यांनी याचा निषेध केला का? असा प्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी विचारला.
मुस्लिमांनीच पत्रकं वाटली संग्राम जगताप म्हणाले की, “हे लोक अजिबात संविधान मानत नाहीत. दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी एका मुस्लिम युवकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पत्रक भिरकावले. पण पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं. ईद वेळी एक पत्रक हे लोक वाटतात. ज्यावर लिहिलंय की ईदची खरेदी आपल्याकडून करा, आपले लोक जकात काढतील तर बाकीचे लोक हत्यार काढतील असा उल्लेख आहे. आपल्याच लोकांकडून खरेदी करा हे सांगायची सुरुवात त्यांनीच केली.”राष्ट्रगितावेळी हे बसून राहतात.संग्राम जगताप म्हणाले की, “भारताची क्रिकेट टीम कोणत्याही टीम कडून सामना हरला की ही पिलावळ फटाके वाजवतात. ही कोणती काल्पनिक गोष्ट नाही, याबाबत पोलीस तक्रार झाली आहे. मागे जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी या लोकांनी दिखाऊ पद्धतीने मदत केली. मनपात जेव्हा सर्वसाधारण सभा होते त्यावेळी राष्ट्रगीत सुरू झाले की, हे लोक उठून जातात. जे लोक सभागृहात असतात ते उठून उभा राहात नाहीत तर मोबाईलवर बघत खालीच बसून राहतात. त्यामुळे राष्ट्रगीत म्हणणारे आणि राष्ट्रगीत सुरू झाल्यावर उभा राहणारे लोक सभागृहात आले पाहिजे.”









