पुण्यातील मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कात्रज येथे नवले पुलावर विचित्र असा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नवले पुलावर कायमच विचित्र असे अपघात होत असतात. ज्यामुळे हे ठिकाण अपघातप्रवण क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते.
याच पुलावर आता तीन वाहनांची टक्कर झाली आहे. दोन कंटेनरची एकमेकांना धडक झाली असून यामध्ये एक कार अडकली, ज्यानंतर या वाहनांना आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात प्राथमिक माहितीनुसार, 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर 20 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Views: 63









