इंदापूर हादरले! रस्त्यावर सापडला पुरुषाच्या तोडलेल्या पायाचा तुकडा..


ता.१२, इंदापूर

पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील कळंब निमसाखर मार्गावर कळंब गावच्या हद्दीत एका हॉटेलपासून 500 ते 700 मीटर अंतरावर माणसाच्या डाव्या पायाचा अर्धा भाग आढळून आलाय.आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आणि यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

याची माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार हा पायाचा भाग पुरुष जातीचा असून तो डाव्या बाजूच्या पायाचा आहे.

डाव्या बाजूच्या पायाचा गुडघ्यापासून खालील हा भाग असून तो वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराचा आता पोलीस सखोल तपास करत आहेत.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!