बारामती :
त्याग, सहनशीलता व कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक असलेल्या त्यागमुर्ती महामाता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सामुदायिक बुद्धपूजापाठ व अभिवादन कार्यक्रम चंद्रमणी नगर बौद्ध विहार, आमराई, बारामती येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात बुद्धपूजापाठाने करण्यात आली. यावेळी महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महामाता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माता रमाई यांच्या त्यागमय जीवनकार्यावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीत रमाई यांनी दिलेले योगदान, त्यांचा संघर्ष, सहनशीलता व कुटुंबासाठी केलेला त्याग याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास बुद्ध उपासक ,उपासीका तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततामय व प्रसन्न वातावरणात पार पडला.चंद्रमणी नगर बुद्ध विहार महिलासमितीच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.









