रिंग रोडवर गांजा विक्री करणारा आरोपी रंगेहाथ जेरबंद : १.९८९ किलो गांजा व मोटारसायकल जप्त..


  • रिंग रोडवर गांजा विक्री करणारा आरोपी रंगेहाथ जेरबंद : १.९८९ किलो गांजा व मोटारसायकल जप्त…!

 

बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई..

बारामती (दि:१) अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत बारामती शहर पोलीस स्टेशनने उत्कृष्ट नियोजन, धाडस व तत्परता दाखवत गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस रंगेहाथ पकडून मोठे यश संपादन केले आहे. या प्रकरणी फरहान युसुफ शेख, (वय २३ वर्षे), (रा. खेड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली आहे. या प्रभावी कारवाईमुळे बारामती शहर पोलीस स्टेशनची प्रतिमा अधिक उज्वल झाली असून अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत (दि :२७) बोके हॉस्पिटलजवळील नवीन रिंग रोड परिसरात एक इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची अचूक व विश्वासार्ह गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे यांना प्राप्त झाली. सदर माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. सदर कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी पो.हवा. सुलतान डांगे, पो.हवा. रामचंद्र शिंदे, पो.कॉ. वैभव मदने, पो.कॉ. राहुल बडे, पो.कॉ. गिरीश नेवसे, पो.कॉ. सागर जामदार, पो.कॉ. अक्षय सीताप, पोलीस पथकाने पंच, वजनकाटा धारक व फोटोग्राफर यांना सोबत घेऊन अत्यंत गोपनीयतेने सापळा रचला. रात्री सुमारे ११:५ मिनिटांनी संशयित इसम मोटारसायकलवर येताना दिसताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करून त्यास पळून जाण्याची संधी न देता रिंग रोडवरच रंगेहाथ पकडले.

 

चौकशीअंती आरोपीचे नाव फरहान युसुफ शेख, (वय २३ वर्षे), (रा. खेड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे निष्पन्न झाले. त्याच्याकडून १ किलो ९८९ ग्रॅम वजनाचा गांजा, अंदाजे किंमत रुपये ३९ हजार ७८० हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (MH१६/DD/६३७४), अंदाजे किंमत रुपये५० हजार असा मुद्देमाल NDPS Act मधील सर्व कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करून पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध NDPS Act कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

 

“बारामती शहर पोलीस स्टेशनकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अंमली पदार्थ विक्री, साठवणूक किंवा वाहतूक याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस व नागरिक यांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन अंमली पदार्थांवर झिरो टॉलरन्स धोरण अवलंबत असून, अशा कठोर कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहतील, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!