लेखी मागणी, सातत्यपूर्ण पाठपुरावा अन् प्रत्यक्ष काम; RPI(आठवले) ची विकासात ठोस भूमिका..!


*बारामती: (दि.03) आमराईतील प्रभाग क्र. 14 मधील कोअर हाऊस येथील अंतर्गत रस्ते करण्यात यावेत अशा स्वरूपाची लेखी मागणी दि.6/3/2025 रोजी RPI(आठवले)पक्षाच्या वतीने बारामती नगर परिषदेकडे करण्यात आली त्याकरिता वारंवार पाठपुरावा देखील करण्यात आला होता. सदर मागणीच्या अनुषंगाने निविदा प्रसिद्ध करून कामाचा आदेश देण्यात आला असून आज रोजी सदर कामास नारळ फोडून प्रत्यक्षात सुरवात करण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले*

*यावेळी मा.रविंद्र(पप्पू)सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPIआठवले)मा. सुनील शिंदे (सचिव प.महाराष्ट्र)मा.रत्नप्रभा ताई साबळे (म. उपाद्यक्षा प. महाराष्ट्र)मा.संजय वाघमारे(तालुका अद्यक्ष),मा.गणेश मागाडे,मा.अनुराग कीर्तिकर आदी सामाजिक कार्यकर्त्यांसह मा. वनिता ताई खुडे, मा. वाडेकर ताई यांच्यासह स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते.*

*सदर रस्त्याची मागणी मान्य करीत प्रत्यक्षात रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने मा.सचिनजी सातव(नगराध्यक्ष बारामती शहर)मा.अमरजी धुमाळ(सभापती बांधकाम विभाग)मा.पंकजजी भुसे(मुख्याधिकारी बारामती नगरपरिषद) यांचे आभार मानत उर्वरित रस्त्यांच्या कामासहित विकासाच्या दृष्टीने आवश्यक कामाकरिता बारामती नगर परिषदेकडे पाठपुरावा करण्यात येईल असे मा. रविंद्र(पप्पू)सोनवणे यांच्याकडून सांगण्यात आले.*


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!