सेवा, विश्वास आणि विकास प्रभाग १६ मध्ये गोरख पारसे यांची मजबूत पकड..!


बारामती (दि:१३)

नगरसेवक पदाचे उमेदवार गोरख पारसे हे सर्वात जास्त मताधिक्यांनी निवडून येणार असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक १६ ची मतदार संख्या ही ६६८९ आहे. तसेच अनेक वर्षापासून होलार समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र यंदा संधी मिळाल्याने फक्त होलार समाजच नव्हे तर इतर समाजामधून देखील गोरख पारसे यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.त्यामुळे पारसे हे सर्वात जास्त लीडने निवडून येणार असल्याची माहिती पत्रकार सुरज देवकाते यांनी माध्यमांना दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने होलार समाजाला न्याय मिळाला असल्याचे देखील देवकाते यांनी सांगितले

गोरख ज्ञानदेव पारसे यांनी प्रभागातील नागरिकांना विविध लोककल्याणकारी सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत मार्गदर्शन व प्रत्यक्ष मदत केली. आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण उपक्रम आणि स्वच्छता मोहिमा राबवून सामाजिक बांधिलकी जपली. युवकांना रोजगारनिर्मितीसाठी संधी उपलब्ध करून देत त्यांच्या प्रगतीला चालना दिली. महिलांसाठी बचत गट, स्वावलंबन उपक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण, करिअर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा वर्गांचे आयोजन केले. प्रभागातील अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, गटारे आदी पायाभूत सुविधांच्या सुधारण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला. कोरोना काळात गरजू कुटुंबांना अन्नधान्य, भाजीपाला व आवश्यक साहित्य वितरित केले. कन्हा नदी स्वच्छता अभियान, प्लास्टिकमुक्त प्रभाग उपक्रम व पाणी बचत जनजागृती राबवून पर्यावरण संवर्धनात योगदान दिले. तसेच क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व युवा उपक्रमांच्या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे कार्य केले.


12
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!