जनतेची सेवा प्रथम, सदैव जनतेसाठी – भाजपा उमेदवार विशाल पवार…!


बारामती:

प्रभाग 14 मध्ये भाजपा उमेदवार विशाल पवारांची दमदार घोषणा!

बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यात बारामती नगरपरिषद निवडणुकीकडे राज्याचे लक्ष नेहमीच वेधले जाते. याच दरम्यान प्रभाग क्रमांक 14 मधून भारतीय जनता पार्टीकडून विशाल पोपट पवार यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली,  उमेदवारीनंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाचे तसेच जनतेचे मनापासून आभार मानले.

“जनतेची सेवा प्रथम… आणि सदैव जनतेसाठी तत्पर!” असे ठाम विधान  नव महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केले, विशाल पवार यांनी भविष्यातील कार्ययोजना आणि पूर्वी केलेली कामे आत्मविश्वासाने मांडली.

 

✅ विशाल पवार यांनी केलेली कामगिरी

उमेदवारीपूर्वी प्रभागात केलेल्या काही महत्त्वपूर्ण विकासकामांवर त्यांनी प्रकाश टाकला—

1️⃣ नगरपालिकेमार्फत बोरवेल पाईप लाईनचे काम पूर्ण

2️⃣ प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी नळयोजनेची अंमलबजावणी

3️⃣ दळण–वळण सुलभ करण्यासाठी रस्त्यांचा विकास

4️⃣ ड्रेनेज लाईनचे जाळे उभारणे

5️⃣ प्रभागातील समाजमंदिराचे रिनोवेशन नूतनीकरण केले.

या कामांच्या आधारे त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केल्याचा दावा केला.

⭐ जनतेने मला संधी दिली तर… भावी महत्त्वाकांक्षी योजना राबवेल,जनतेचा पाठिंबा मिळाल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प त्यांनी या वेळी व्यक्त केला—

1️⃣ प्रत्येक कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल देणार

2️⃣ युवा आणि महिलांसाठी रोजगारनिर्मिती.

3️⃣ शिक्षणासाठी आर्थिक व प्रशासकीय मदत.

4️⃣ वाचनाची आवड जोपासण्यासाठी प्रत्येक गल्लीत वाचनालय

💬 “जनतेने दिलेल्या संधीचं सोने करणार!”

आपल्या घोषणेत त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले—

“या प्रभागाची सेवा करण्यासाठी मी सदैव तयार आहे. मला संधी दिल्यास, मी या संधीचं सोनं करून दाखवेन”.


12
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!