बारामती न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल, खून प्रकरणात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा; 3,000 रुपयांचा दंड ठोठावला..


बारामती:

दिनांक १०/१२/२०२५ रोजी बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश नं. १ मा. श्री. व्ही. सी. बर्डे साो. यांनी पनिश उर्फ पांग्या आनंदया भोसले मूळ रा. सोनगाव ता. बारामती जि. पुणे या आरोपीने युवराज आबासो थोरात रा. सोनगाव ता. बारामती जि. पुणे. याचा खून_केल्याप्रकरणी कलम ३०२ साठी जन्मठेपेची (आजन्म कारावास) व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद तसेच कलम ५०४ साठी १ वर्षे शिक्षा ठोठावली आहे.

थोडक्यात सविस्तर हकीकत अशी की, दिनांक १५/०१/२०२० रोजी आरोपी पनिश उर्फ पांग्या आनंदया भोसले मूळ रा. सोनगाव ता. बारामती जि. पुणे. याने दि. १५/०१/२०२० रोजी मकर संक्रातीचा सण असल्यामुळे युवराज आबासो थोरात हे निरा व क-हा नदीचे संगमावरील सोनेश्वर मंदीरात देवाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळेस त्यांच्या सोबत त्यांच्या घरातील सर्व लोक बरोबर होते. त्यावेळेस आरोपी नामे पनिश उर्फ पांग्या आनंदया भोसले याने युवराज आबासाहेब थोरात यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. व त्यांना धक्का बुक्की करण्यास सुरूवात केली व म्हणाला की, तुझी बायको सरपंच असल्यामुळे तुम्हाला लय माझ आलाय का असे म्हणुन युवराज थोरात यांना धक्का मारूण खाली पाडले व स्वतःच्या कमरेला असलेला चाकु काढून युवराज थोरात याचे उजवे बाजुचे छातीमध्ये खुपसला. त्यामुळे युवराज थोरात हे सदर जखमेमुळे मयत झाले व आरोपी हा तेथून पळून गेला. सदर बाबतची फिर्याद सुरज युवराज थोरात यांनी बारामती तालुका पोलिस स्टेशन येथे दि. १५/०१/२०२० रोजी दाखल केली. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण केल्यानंतर आरोपी विरूध्द मा. जिल्हा न्यायाधिश १ यांचे कोर्टात चार्जशिट दाखल करण्यात आले..

सदरील सेशन केस मध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासले. सदर खटल्या कामी साक्षीदार व तपासी अधिकारी यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. सदरील सेशन केसमध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी काम पाहिले. सदर केसमध्ये फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे जबाब व सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन मे. न्यायालयाने भा.द.वि. कलम ३०२ व ५०४ अन्वये वरीलप्रमाणे आरोपीस जन्मठेपेची व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद तसेच कलम ५०४ साठी १ वर्षे शिक्षा ठोठावली आहे.

सदर प्रकरणी बारामती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी प्रमोद पोरे व अण्णासाो घोलप तसेच बारामती येथील पैरवी अधिकारी गोरख कसपटे तसेच कोर्ट अंमलदार महिला पो.हवा. रेणुका पवार तसेच सदर सेशन केसचे संपुर्ण कामकाज सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी पाहिले. व त्यांना सहकार्य अॅड. विनोद जावळे, अॅड. परिश रूपनवर, विश्वतेज थोरात, यांनी मोलाचे सहकार्य केले.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!