संपादक – अनिकेत कांबळे (ता.१६)
बारामती : कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, कऱ्हाटी (ता. बारामती, जि. पुणे) यांच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये पदभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत शिक्षण, तांत्रिक, प्रशासकीय तसेच इतर सहाय्यक पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
संस्थेअंतर्गत अॅडमिशन व मार्केटिंग कोऑर्डिनेटर, टेलिकॉलर, अकाउंटंट* या पदांसह शाळा व आयटीआय विभागासाठीही शिक्षक व प्रशिक्षकांची पदे उपलब्ध आहेत. तसेच *इलेक्ट्रिशियन, सोलार टेक्निशियन, फायर अँड सेफ्टी, मल्टिमीडिया, मोटार वाहन मेकॅनिक* अशा विविध तांत्रिक क्षेत्रातील पदांसाठीही संधी उपलब्ध आहे.
गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध विषयांचे सहाय्यक शिक्षक ( *सायन्स, मॅथ, इंग्रजी, हिंदी, ड्रॉइंग, म्युझिक* ) यांची भरती होणार आहे. याशिवाय हॉस्टेल विभागासाठी *रेक्टर व सिक्युरिटी गार्ड, तसेच कृषी विभागासाठी अग्री पियन* पदांसाठीही अर्ज मागविण्यात आले आहेत.

उमेदवारांनी आपले अर्ज ३० एप्रिल २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते सायंकाळी ५) सादर करावेत. पात्र उमेदवारांना मुलाखतीबाबतची माहिती फोन किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
Email ID: kumss@kumss.org
Contact No.: 9423684242/9423694242, Website: www.kumss.org









