एकता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..!


दि:(26 जाने) बारामती प्रतिनिधी:

आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती येथील एकता इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज बारामती येथे ७७ वा  प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नगरसेवक व आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली व उपस्थितांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले.

 

यावेळी कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. अल्ताफभाई सय्यद ( नगरसेवक बा.न प)  मा. सुधीर नाना सोनवणे(माजी नगरसेवक)  शाळेचे शिक्षकवृंद, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीत  सादर केले. या सादरीकरणांनी उपस्थित मान्यवरांसह शिक्षक व पालकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!