ता.१४ ( संपादक-अनिकेत कांबळे)
बारामती मधील आमराई येथे भीमनगर हौसिंग सोसायटी, या ठिकाणी भीमगीतांचा व समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्याच घटनेला आज ६९ वर्ष पूर्ण होत आहेत.त्याच दिवसाचे औचित्य साधून ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त आयु. पुण्यशील लोंढे प्रस्तुत सम्राट गायन पार्टी यांचा प्रबोधनात्मक भीमगीतांचा व समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाचे आयोजक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महिला समिती व एस आर स्पोर्ट्स क्लब भीमनगर बारामती यांनी या भीमगीतांचा व समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला समाजातील बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले









