महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र भर दुख:वटा..! बारामती मधील वडगाव निंबाळकर येथे शोकसभा पार पडली.


अजित पवारांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. वडगाव निंबाळकर मध्ये शोकसभा..

दि.२९ (वडगाव निंबाळकर प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काल विमान अपघाता मध्ये दुर्दैवी निधन झाले. यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर हळहळ झाली. आणि सर्वत्र दुःखाचा डोंगर कोसळला आणि आज दिनांक 29/01/2026 रोजी अजित पवारांवर बारामती येथील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. कार्यकर्ते घोषणा देत होते. अमर रहे..! अमर रहे..! अजित पवार अमर रहे..! अशा घोषणा देत जड अंतःकरणाने अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यात आला. आणि त्याच अनुषंगाने *वडगाव निंबाळकर मध्ये शोकसभा* आज आयोजित करण्यात आली होती. या मध्ये अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आठवणींनी उजाळा देण्यात आला

यावेळी वडगाव निंबाळकर चे सरपंच सुनील ढोले यांनी अजित दादांच्या अकाली जाण्याने सर्वात मोठी हानी झाली असून संपूर्ण गाव पवार कुटुंब यांच्या दुःखामध्ये सहभागी असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी राजकुमार शहा, अनिल शहा, संजय साळवे, निलेश साळवे, ॲड सचिन साळवे, यांच्यासह गावातील नागरिकांनी श्रद्धांजली अर्पित केली.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!