भिगवण प्रकरणात जोडप्याला मदत कोणी केली? संशयाचा धूर कायम; अखेर भाजप आमदार राहुल कुल समोर..!


: (दि.२०)

भिगवण प्रकरणातील मुलगी बारामती कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी मुलीच्या नातेवाईकांकडून आमदार राहुल कुल यांच्याविरोधात कोर्टाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली.

तसेच अपहरप्रकरणी कुल यांचा संबंध असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या सगळ्या घडलेल्या प्रकारानंतर आमदार राहुल कुल यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे. मुलीची बाजू घेतल्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहे. जे दोषी आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील राहुल कुल यांनी केली आहे.

राहुल कुल म्हणाले, ज्यावेळेस गुन्हा घडला त्यावेळी मी मुलीच्या नातेवाईकांच्या संपर्कात होतो. मुलीचा शोध घेईपर्यंत मी पोलीस प्रशासनाच्या संपर्कात होतो. माझ्यावर जे आरोप झालेत मलाही एक मुलगी आहे माझ्या घरात महिला पदाधिकारी आहे. मुलीची बाजू घेतल्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जातात. दोषींवर कारवाई करण्यात यावी, आधी वस्तुस्थिती तपासावी आणि मग आरोप करावे.

नेमकं काय म्हणाले राहुल कुल?

भिगवण येथील घटना घडली याबाबत गुन्हा दाखल झाला असून याबाबत मी पोलीस प्रशासनाला सूचना देऊन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहे. सामाजिक जाणिवेतून आम्ही काम करीत असतो. माझ्या घरात मुली आहेत,माझ्या घरातील महिला राजकीय क्षेत्रात काम करीत आहेत. आम्ही मुलीच्या बाजूने भक्कमपणे उभे असल्याने जाणीवपूर्वक आमची बदनामी केली असावी असं आम्हाला वाटतं. जे आरोप करीत आहेत,त्यांनी वस्तुस्थिती पाहून आमच्यावर करावेत..आम्ही त्या कुटुंबातील लोकांच्या पाठीशी आहोत.. माझ्या घरात मुली आहेत,त्यांच्या घरात मुली आहेत,त्यामुळे आरोप करताना वस्तुस्थिती पाहावी, असेही राहुल कुल म्हणाले.

मुलीच्या कुटुंबाला मदत करण्याची माझी तयारी: राहुल कुल

मला घटना कळाली की मी लगेच पोलिसांच्या संपर्कात होतो,त्यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. मी त्या मुलीच्या मामांच्या संपर्कात होतो,आणि त्यांना मदतही केली तपासाची सगळी माहिती मुलीच्या कुटुंबाला द्यावी आणि मुलीच्या कुटुंबाला तपासात सहकार्य करावे अशी मागणी मी पोलिसांना केली आहे. मुलीच्या कुटुंबियांच्या मी संपर्कात आहे. आवश्यकता असेल तर मी त्यांना भेटेल आणि मला त्यांना मदत करायला आवडेल, असेही राहुल कुल म्हणाले.

दरम्यान माझे प्रेमसंबध असल्याची कबुली मुलीने कॅमेऱ्यासमोर येत दिली आहे. माझ्या अपहरणाच्या बातम्या खोट्या असल्याचं देखील मुलीने स्पष्ट केले


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!