बारामती, (ता.18)
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व बारामतीचे भाग्यविधाते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून तसेच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर कायम चालण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स (ISSE), बारामती लोकल सेंटर तर्फे *“Modern High-Rise Construction & Retrofitting Needs”* या विषयावर तांत्रिक सेमिनार हॉटेल सिटी इन, बारामती येथे यशस्वीरीत्या पार पडला.
या सत्राची सुरुवात भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या व आयझाक न्यूटन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या सेमिनारमध्ये ISSE BLC सदस्य, CREDAI बारामती, BAI बारामती, अभियंते, अकॅडेमिशियन तसेच बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात तज्ज्ञ अभियंता मा. श्री. धैर्यशील खैरे पाटील, पुणे यांनी आधुनिक उच्च इमारत बांधकामाचे तंत्रज्ञान, बांधकामादरम्यान होणाऱ्या चुका टाळण्याचे उपाय, तसेच इमारतींचे आयुष्यमान वाढवण्यासाठी आवश्यक रेट्रोफिटिंग प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास ISSE बारामती लोकल सेंटर चे अध्यक्ष मा. श्री. सुरज चांदगुडे, सचिव मा. श्री. विकास निर्मळ, खजिनदार मा. श्री.प्रवीण सावंत, कार्यकारी सदस्य श्री.दिलीप यादव, श्री.शहाजी परकाळे, डॉ. स्नेहल वाळके तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.
बारामतीसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात High-Rise बांधकामाचे वाढते महत्त्व अधोरेखित करत या सेमिनारमधून उपस्थितांना उपयुक्त व व्यावहारिक माहिती मिळाली. हा कार्यक्रम JSW Neo Steel व Mittal Agencies यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ISSE बारामती लोकल सेंटर चे अध्यक्ष मा. श्री. सुरज चांदगुडे यांनी केले, तर सचिव मा. श्री. विकास निर्मळ यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. यशस्वी उपक्रमासाठी सर्व सहभागी, मान्यवर व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे ISSE, बारामती लोकल सेंटर तर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.








