संपादक- अनिकेत कांबळे (ता.१७)
बारामती : बारामती शहरातील पथविक्रेते यांचे नगर परिषदेकडे सर्वेक्षण करून नोंदणी करणे, हॉकर्स झोन तयार करणे, व इतर मागण्यांबाबत दिनांक २०/०४/२०२६ रोजी बारामती नगर परिषद समोर युवा पँथर पथविक्रेता ,फेरीवाला संघ लक्षवेधी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिली.
विकसित बारामतीत गरीब पथ विक्रेते यांच्यावर अतिक्रमण कारवाई करून त्यांना बेरोजगार करण्याचे काम नगर परिषद करीत आहे.
ज्याठिकाणी हातगाडे,स्टॉल होते त्यांना हटवून त्याच जागेवर गाळे बांधून विक्री केले आहेत.त्यामुळे गरिबांच्या पोटावर पाय देण्याचे काम विकासाच्या नावाखाली सुरू आहे का असा प्रश्न पथ विक्रेते यांना पडला आहे.
उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी विधानसभा निवडणुकीवेळी हॉकर्स झोन करणार असलेबाबत भाषणात सांगितले होते.परंतु स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पथ विक्रेते यांच्याबाबत आजपर्यंत निर्णय घेतलेला नाही.
पथविक्रेते यांच्या हक्कासाठी बारामती नगर परिषद समोर आंदोलन केले जाणार आहे.








