मोठी बातमी! भोंदू खरातच्या निकटवर्तीयाचा आणि त्यांच्या पत्नी चा मृत्यू, समृद्धीवर भीषण अपघातात गेला जीव.
(ता.१७)
अशोक खरात याचा निकटवर्ती असलेले जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचे अपघाती निधन झाले आहे. शिर्डीजवळ समृद्धी महामार्गावर अपघातात त्यांचं निधन झाले आहे
ट्रकने शेळके यांच्या गाडीला जोरात धडक दिली, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात, याची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना धोत्रे गावाजवळ शेळके यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे खरात प्रकरणाचा काही संबंध आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. शेळके हे अशोक खरात याचे निकटवर्तीय होते. खरातला अटक केल्यानंतर शेळके प्रचंड तणावात असल्याचीही माहिती मिळाली आहे.
संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यासोबत त्यांच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला आहे . या अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखम झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह कारने शिर्डीच्या दिशेने निघाले होते. धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या एका कंटेनरला त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरच्या खालच्या बाजूला घुसली.
अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जितेंद्र शेळके हे भोंदू खरातचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. खरात यांच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चे ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते, तसेच खरात यांच्या लॉन्समध्येही त्यांची भागीदारी होती, असे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात याला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके मानसिक तणावाखाली होते.
अपघात की घातपात…?








