बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्कमध्ये अनुसूचित जातींसाठी विकास आराखडा; महिलावर्गातून उत्स्फूर्त स्वागत


*बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्कमध्ये अनुसूचित जातींसाठी विकासात्मक कृती आराखडा : महिलावर्गातून कौतुकाची लाट*

संपादक – अनिकेत कांबळे

*बारामती : (दि.१४) बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्क लिमिटेड म्हटले की अनेक कुटुंबांच्या स्वप्नांना आधार देणारे एक मोठे कुटुंब डोळ्यासमोर उभे राहते. आदरणीय उपमुख्यमंत्री *सुनेत्रा वहिनी पवार* यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले हे टेक्सटाइल पार्क हजारो महिलांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे ठरले आहे. याच कुटुंबात जागतिक महिला दिनानिमित्त साधेपणात, शांततेत पण अत्यंत अर्थपूर्ण अशा पद्धतीने महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारे प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आले.

 

सुनेत्रा वहिनी पवार यांनी टेक्सटाइल पार्कची उभारणी करतानाच येथे काम करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आपले मानून त्यांची जपणूक केली. आज त्याच भावनेतून गरजू अनुसूचित जातींतील महिलांना घरगुती उपयोगी साहित्य देऊन त्यांच्या संसाराला हातभार लावण्याचा संवेदनशील उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे अनेक महिलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे.

 

*ICAR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट (NIASM), बारामती* यांच्या सहकार्याने अनुसूचित जातींसाठी विकासात्मक कृती आराखडा (Development Action Plan for Scheduled Caste) अंतर्गत गरजू महिलांना लाभ देण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १०० *अनुसूचित जातींतील महिलांना विविध लाभ कीटचे वितरण* करण्यात आले.

 

या लाभ कीटमध्ये *पाण्याची टाकी, मोटार, पाईप, ताडपत्री, घरगुती भांडी संच, डायनिंग कीट आदी वस्तूंचा समावेश* होता. या माध्यमातून ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. लाभ कीट स्वीकारताना अनेक महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, कृतज्ञतेची भावना आणि नव्याने उभारी घेण्याचा आत्मविश्वास हे या उपक्रमाचे खरे यश ठरले.

 

याप्रसंगी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला, याचा ऑनलाइन कार्यक्रमही सर्वांनी एकत्रित पाहिला.

 

या उपक्रमासाठी *ICAR डायरेक्टर डॉ. सॅमी रेड्डी,  डॉ.भास्कर गायकवाड आणि डॉ. नितीन कुराडे* यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी टेक्सटाइल पार्क कार्यालयाच्या वतीने *श्री. विजय कोकाटे आणि सौ. वृषाली सावंत* यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम घडवत *बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्क* समाजातील वंचित घटकांपर्यंत विकासाची नवी किरणे पोहोचविण्याचे काम सातत्याने करत आहे. त्यामुळे या उपक्रमाचे महिलावर्गातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!