रोजगार, शिक्षण, आरोग्य हेच प्राधान्य; गोरख पारसे यांची ठाम भूमिका


  • रोजगार, शिक्षण, आरोग्य हेच प्राधान्य; गोरख पारसे यांची ठाम भूमिका

बारामती (दि:१४)

बारामती सह संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात बारामती नगरपरिषद निवडणुकीकडे राज्याचे लक्ष नेहमीच वेदले जाते. याच दरम्यान प्रभाग क्रमांक 16 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार गोरख ज्ञानदेव पारसे यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाचे तसेच जनतेचे मनापासून आभार मानले.

 

भावी महत्वाकांक्षी योजना राबवेल जनतेचा पाठिंबा मिळाल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. युवा आणि महिलांसाठी रोजगार निर्मिती करेल, शिक्षणासाठी गोरगरीब मुला मुलींना आर्थिक मदत करण्यास तयार राहील,

आरोग्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील , प्रभागातील ड्रेनेज लाईन, रस्ते, पिण्याचे पाणी असे विविध मूलभूत गरजा पूर्णत्वास नेईल जनतेची सेवा प्रथम आणि सदैव जनतेसाठी तत्पर असे ठाम विधान त्यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.रोजगार, शिक्षण, आरोग्य हेच प्राधान्य गोरख पारसे यांची ठाम भूमिका.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!