बारामती (दि:१४)
बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात बारामती नगरपरिषद निवडणुकीकडे राज्याचे लक्ष नेहमीच वेदले जाते. याच दरम्यान प्रभाग क्रमांक १३ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार अश्विन (सोनू) प्रसद साबळे यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाचे तसेच जनतेचे मनापासून आभार मानले.
प्रभाग क्रमांक १३ब मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अश्विन (सोनू) साबळे हे सर्वात जास्त मताधिक्यांनी निवडून येणार असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक १३ब ची मतदार संख्या ही ५५०७ आहे. तसेच सर्व सामान्य व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली हे पाहून नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोनू साबळे यांना बहुजन समाजातून नव्हे तर इतर समाजामधून देखील मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.त्यामुळे साबळे हे सर्वात जास्त लीडने निवडून येणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे.
माजी कृषी मंत्री खा. आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर्व सामान्य नागरिकाला न्याय मिळाला असल्याचे देखील अश्विन (सोनू) साबळे यांनी सांगितले
अश्विन (सोनू) साबळे यांनी प्रभागातील नागरिकांना विविध लोककल्याणकारी सरकारी योजनांचा लाभ मिळवून देऊ असेही मत त्यांनी व्यक्त केले. आणि जनतेसाठी कायम कटिबद्ध राहू असा विश्वास अश्विन साबळे यांनी व्यक्त केला..









