बारामती : ता.१३
खुनाच्या गुन्ह्यातून सुटलेल्या आरोपीने तू माझी माफी माग असे म्हणत तर दुसरे आरोपीने याला माफी मागायला लावू नको आज याला ठेवायचे नाही असे म्हणत कोयत्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आली तसेच कोयता हवेत फिरवत भाई आम्ही येथील भाई आहोत असे म्हणत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयेश माने, प्रथमेश गवळी, विनोद जाधव व इतर चार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत अटक आरोपी पैकी जयेश माने याने त्याच्या इतर साथीदारांसह गणेश वाघमोडे यांचा खून केला होता याप्रकरणी तो जेलमध्ये होता मागील दीड महिन्यापूर्वीच जेलमधून सुटून बाहेर आला होता..सदर मारहाण प्रकरणातील आरोपी जयेश माने प्रथमेश गवळी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील रुई छत्तीशी येथून मोठ्या शिताफिने ताब्यात घेण्यात आले…
दोन्ही गटाच्या आरोपींचा जुलै 2023 मध्ये वाद झाला होता यावेळी आरोपी जयेश मानेला मारहाण करण्यात आली होती माने याच्या फिर्यादीवरून गणेश वाघमोडे गौरव सूळ व इतरांवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता..सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम बाळासाहेब कारंडे सहाय्यक फौजदार एस जे वाघ पोलीस हवालदार खारतोडे स्वप्निल अहिवळे पोलीस शिपाई होळंबे यांनी केली.. पुढील तपास पोलीस करत आहेत..









