बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क येथे अजित दादांच्या प्रतिमेला राखी बांधून रक्षाबंधन साजरा..!


बारामती: (दि.२८ )                                     संपादक – अनिकेत कांबळे 

*रक्षाबंधन म्हणजे दादा आणि बहिणीच्या अतूट नात्याची भावपूर्ण आठवण..!* ❤️

दादा आज जरी आपल्यात नसले, तरी आजचा *रक्षाबंधनाचा पवित्र दिवस* महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी दादांच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि अतूट नात्याची आठवण करून देणारा आहे.

बहिणीच्या सन्मानासाठी, सुरक्षिततेसाठी आणि तिच्या स्वावलंबनासाठी दादांनी सुरू केलेली *‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’* हीच आज प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी दादांच्या प्रेमाची आणि काळजीची *अनोखी रक्षाबंधनाची ओवाळणी* ठरत आहे.

आज *बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क कार्यालयात* काही महिला कर्मचारी एकत्र येऊन दादांच्या प्रतिमेस राखी बांधून *रक्षाबंधन साजरे केले.* भाऊ-बहिणीच्या या पवित्र नात्याची आठवण जपत, दादांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्याचा हा छोटासा, पण मनापासून केलेला प्रयत्न होता. ❤️

टेक्सटाईल पार्कमध्ये काल गुरुवार आणि आज रक्षाबंधनानिमित्त सलग दोन दिवस सुट्टी असल्याने आज विविध कंपन्यांमधील काही महिला प्रतिनिधिक स्वरूपात कार्यालयात एकत्र आल्या. वातावरणात एक वेगळीच भावनिकता होती— *दादा प्रत्यक्षात नसले तरी त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य आणि बहिणींसाठी त्यांनी जपलेली आपुलकी आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे.*

*लाडक्या बहिणीचा दादा म्हणजे… अजित दादा..!*
आणि आज प्रत्येक बहिणीच्या मनातील राखीची एक ओवाळणी दादांच्या स्मृतींना…! 🙏❤️

 


18
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!