कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था, काऱ्हाटी संकुलात ‘आरंभ… यशाचा प्रारंभबिंदू’ व्याख्यानमालेचे आठवे पुष्प उत्साहात संपन्न..!


बारामती (दि. १९ ऑगस्ट २०२६):

कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था, काऱ्हाटी यांच्या वतीने आयोजित *‘आरंभ… यशाचा प्रारंभबिंदू’* या प्रेरणादायी व्याख्यानमालेअंतर्गत *आठव्या पुष्पाचे* आयोजन उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून *प्रा. मनोज शिवाजी वाबळे*, करिअर मार्गदर्शक, प्रेरणादायी वक्ते, कॉर्पोरेट ट्रेनर, लाईफ कोच तसेच अध्यक्ष – शब्दधन सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांनी *“ध्येय स्वप्नांचा, प्रवास कर्तृत्वाचा व कृतज्ञता दादांसाठी”* या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

 

आपल्या मार्गदर्शनात *प्रा. मनोज वाबळे* यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन करताना त्या स्वप्नांना ध्येयाची दिशा देऊन सातत्य, शिस्त, सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर ती साकार करण्याचा संदेश दिला. जीवनात यश मिळवताना आपल्या ध्येयासोबतच समाजाप्रती असलेली बांधिलकी, कृतज्ञता, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेची भावना जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

यावेळी त्यांनी *आदरणीय अजितदादा पवार यांच्या कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी कार्याचा विशेष उल्लेख* करत त्यांच्या *गुणसंपन्न व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला.* दादांनी आपल्या कार्यातून *विकासाची दूरदृष्टी, शिस्तप्रियता, निर्णयक्षमता, सातत्य, कार्यतत्परता, लोकांशी असलेली आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा* यांचा आदर्श समाजासमोर ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.

 

*“अजितदादांचे कार्य केवळ विकासकामांपुरते मर्यादित नसून, ध्येयासाठी झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, वेळेचे भान, शिस्त, सातत्य आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारे आहे,”* असे सांगत विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात *शिस्त, कष्ट, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाप्रती संवेदनशीलता* या गुणांचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

विद्यार्थ्यांनी केवळ यशस्वी होण्याचे स्वप्न न पाहता *चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक होण्याचेही ध्येय* ठेवावे. आपल्या कर्तृत्वातून कुटुंब, संस्था, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याची भावना प्रत्येक विद्यार्थ्याने मनात रुजवावी, असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला.

 

याप्रसंगी *शब्दधन सोशल फाउंडेशन* यांच्या वतीने कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेस *५१ पुस्तके भेट* देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीला आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या पुस्तक भेटीबद्दल संस्थेच्या वतीने *शब्दधन सोशल फाउंडेशनचे आभार व्यक्त करण्यात आले.*

ही व्याख्यानमाला संस्थेच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री *मा. श्रीम. सुनेत्रा (वहिनीसाहेब) अजितदादा पवार* यांच्या प्रेरणेतून व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, करिअरविषयक दृष्टीकोन, जीवनमूल्यांची जपणूक आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे हा या व्याख्यानमालेचा प्रमुख उद्देश आहे.

 

कार्यक्रमाचे *प्रास्ताविक संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री. विकास निर्मळ* यांनी करून व्याख्यानमालेमागील उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांच्या मनात मोठी स्वप्ने निर्माण करून त्यांना योग्य दिशा, प्रेरणा आणि मार्गदर्शन देणे, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन सौ. माधुरी पवार* यांनी केले, तर *आभार प्रदर्शन सौ. शितल थोरात* यांनी मानले.

 

यावेळी संकुलातील *सर्व विभागांचे प्राचार्य, प्राचार्या, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.* संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांना *ध्येय, कर्तृत्व, शिस्त, सातत्य आणि समाजाप्रती बांधिलकी* यांचा आदर्श घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल करण्याची प्रेरणा देणारे हे व्याख्यान ठरले.

 

*‘प्रेरणेतून दिशा… दिशेतून यश…’* या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या *‘आरंभ… यशाचा प्रारंभबिंदू’* व्याख्यानमालेचे आठवे पुष्प विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरले.


18
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!