ऑल इंडिया संपादक संघाची पुणे जिल्हा आढावा बैठक यशस्वी, पत्रकार संघटनात्मक बळकटीवर भर.


*ऑल इंडिया संपादक संघाची पुणे जिल्हा आढावा बैठक यशस्वीपणे संपन्न*

बारामती | रविवार, 15 फेब्रुवारी 2026

ऑल इंडिया संपादक संघाच्या तिसरा वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तसेच संघाच्या पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शनासाठी आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मीटिंग हॉलमध्ये यशस्वीपणे पार पडली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. स्वप्निल कांबळे होते. बैठकीस संघाचे, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच सक्रिय सभासद उपस्थित होते.

बैठकीतील प्रमुख विषय:

▪️ तिसरा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा ठरवण्यात आली.

▪️ सभासद नोंदणी अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

▪️ नवीन कार्यकारिणीच्या रचनेबाबत चर्चा करून काही महत्त्वाचे प्रस्ताव मांडण्यात आले.

▪️ पत्रकारांच्या समस्या, संघटन वाढ, प्रशिक्षण शिबिरे आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर यावर सखोल चर्चा झाली.

यावेळी बोलताना श्री. स्वप्निल कांबळे यांनी सांगितले की,*ऑल इंडिया संपादक संघ हा केवळ संघटना नसून पत्रकारांच्या हक्कांसाठी काम करणारे व्यासपीठ आहे. आगामी काळात संघ अधिक मजबूत आणि व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे.*

बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या व संघाच्या पुढील उपक्रमांसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

यावेळी भिमसेन उबाळे,दशरथ मांढरे,मन्सूर शेख,निलेश जाधव,कृष्णमुर्ती जगताप,सुभाष साठे,उदयसिंह देशमुख,संतोष जमदाडे,अनिकेत कांबळे उपस्थित होते.शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून बैठक यशस्वीपणे संपन्न झाल्याचे जाहीर करण्यात आले.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!