यवत पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक निखिल रणदिवे शुक्रवार च्या दुपारी मोबाईल वर स्टेटस ठेवत बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे.आणि मुलीचा फोटो स्टेटस ठेवत दिली धक्कादायक बातमी.
माझी प्रिय दिदी आज तुझा
पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथे वरिष्ठांची मनमानी चालते. तसेच चार पाच दिवसा पूर्वी तु आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पीटल मध्ये घेवुन जाता आले नाही. यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली ०१ वर्ष पासुन सतत त्रास देत आहे. माझा नाई विलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे माझेकडुन दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा असा भावनिक स्वतःच्या मोबाईल स्टेटस ठेवत पोलिस नाईक निखिल रणदिवे हे शुक्रवार दुपार पासून बेपत्ता झाले आहेत यवत पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे बोलताना म्हणाले की त्यांची बदली शिक्रापूर येथे झालेली आहे आणि मला त्यांनी मला कधी ही सोडा असे सांगितलं न्हवत रणदिवे मला बोले नाही सोडा तरी ही मी सांगितलं होत त्यांना सोडतो म्हणून असे यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले असून तरी सुद्धा पोलिस नाईक निखिल रणदिवे यांच्या स्टेटस मधून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी त्रास दिल्याचं त्यांच्या मोबाईल स्टेटस वरून दिसून येत आहे त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी 4 पथक रवाना केली आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.









