बारामती: दि.६ नोव्हें
राजकारणात सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर…!
4 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत नगरपालिका नगरपंचाय निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला या नंतर बारामतीच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, कारण ‘अ’ दर्जाच्या बारामती नगर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांची सत्ता असली तरी तिकिटासाठी अंतर्गत चुरस एवढी तीव्र आहे की कार्यकर्त्यांपासून नगरसेवकांपर्यंत सगळ्यांची धडपड चालू झाली आहे पण या सगळ्यात सगळ्यांच लक्ष केंद्रित झाले आहे ते म्हणजे प्रभाग क्रमांक १० वर कारण हा प्रभाग क्रमांक १० राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे एका स्थानिक पोर्टल काही दिवसांपूर्वी एक्झिट पोल घेतला होता आणि हाच एक्झिट पोल बारामतीत खळबळ उडवून गेला. त्याचं कारण हा सर्वेक्षण कोणी लावला कशासाठी लावला आणि कोणाच्या सूचनेवर लावला हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. त्या एक्झिट पोल मध्ये काय घडलं तर माजी नगरसेवक सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या एनजीओ कार्यकर्ता आणि स्थानिक प्रभावशाली व्यक्ती या सगळ्याना मागे टाकत एक सर्वसामान्य कुटुंबातील पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा सचिन जगदाळे यांनी आघाडी घेतली होती.
*जनतेचाच कल स्पष्ट*
की सचिन जगदाळे हा युवकच नगर सेवक पदाचा दावेदार आहे.
सचिन जगदाळे यांनी आतापर्यंत कोणतही शक्ती प्रदर्शन केलं नाही. ना कोणती बॅनरबाजी केली ना कोणतही फोटोसेशन केलं. फक्त आणि फक्त सामाजिक कामाच्या जोरावर त्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केला आहे आणि त्यांचं प्रत्यंतर या एक्झिट पोल मध्ये स्पष्टपणे दिसलं, हा तर सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक तरुण आघाडीवर हे चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे जनतेतून आवाज उठतोय सचिन जगदाळे हाच तर खरा लोकांच्या मनातील उमेदवार आहे.
या मध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की (अजित पवार गट) या सगळ्या गोष्टीचा विचार करणार का हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.








