भिगवण रोडवरील जुन्या पुलाखाली अनोळखी महिलेचा मृतदेह – डाव्या हातावर ‘Raviraj’ टॅटू!


बारामती:भिगवण पोलीस स्टेशन येथील मौजे मदनवाडी गावच्या हद्दीत दि.22 रोजी दुपार नंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला भिगवण, बारामती रोडवरील जुन्या पुलाच्या खाली एक अनोळखी ३०, ते ३५, वर्षे वयोगटातील महिला मृत अवस्थेत मिळून आलेली आहे, सदर महिलेच्या डाव्या हातावर इंग्लिश मध्ये Raviraj अशा नावाचा टॅटू काढलेला आहे. सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. महिलेच्या अंगावरती जांभळ्या रंगाचा टॉप व क्रीम कलरची लेगिन्स पॅन्ट घातलेली आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे या महिलेचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत सापडला असून ती महिला सहा ते सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला या दरम्यान परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे हे मोठ आवाहन भिगवण पोलिसांसमोर असणार आहे प्राथमिक अंदाजानुसार हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

भिगवण पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असून, आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज,हरवलेल्या महिलांच्या तक्रारी आणि मोबाईल लोकेशन यांची तपासणी सुरू आहे.ओळख पटल्यानंतर या खुनामागील कारणांचा आणि आरोपींचा शोध घेणे सोपे होईल,अशी माहिती तपास अधिकार्‍यांनी दिली आहे जो पर्यंत या प्रकरणाचे धागे दोरे पोलिसांच्या हाती लागणार नाहीत तो पर्यंत या प्रकरणाचे गूढ कायम राहणार आहे


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!