बारामती :(ता.०९)
फलटणमधून एक चिंताजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे…दोन बहिण-भावंडं गेल्या काही तासांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे…मिळालेल्या माहितीनुसार,बारामती तालुक्यातील मेखळी गावचे रहिवासी किरण काकासो चोपडे आणि काजल काकासो चोपडे
हे दोघेही ७ तारखेला घरातून कॉलेजला जाण्यासाठी निघाले होते…मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत…शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून,कॉलेजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहे…त्या फुटेजमध्ये दोघेही दुपारी सुमारे ३ वाजता कॉलेजमधून बाहेर पडताना दिसत आहेत…पण त्यानंतर त्यांचा कुठलाच मागमूस लागलेला नाही…या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण आहे,
आणि संपूर्ण परिसरातून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे…दोघांकडे MH 12 C 1120 सीडी डॉन या नंबरची गाडी असल्याची माहितीही समोर आली आहे…
- नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,जर कोणाला या दोघांबाबत कोणतीही माहिती मिळाली,किंवा ते कुठे दिसले असतील, किंवा कोणताही सुगावा लागला,तर कृपया तात्काळ 9890344801 या नंबरवर संपर्क साधावा…
तुमची एक छोटीशी माहिती…
एका कुटुंबाला पुन्हा एकत्र आणू शकते…








