पंचशील मित्र मंडळाचा भव्य उपक्रम! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन


वडगाव प्रतिनिधी :(दि.३१)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पंचशील मित्र मंडळ, पंचशील नगर, वडगाव निंबाळकर यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये 13 एप्रिल रोजी महिलांसाठी संगीत खुर्ची, 14 एप्रिल रोजी प्रतिमा पुजन व अन्नदान, दि .15 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायिका दीक्षा व्हावळ यांचा *दौलत निळ्या सागराची* हा कार्यक्रम सायं. ७.०० वा. आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन पंचशील मित्र मंडळातर्फे श्री राजेंद्र मारुती माने, श्री अभिजीत अर्जुन साळवे, श्री संपत साळवे व यश आहिवळे यांनी केलेल आहे. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य श्री संजय साळवे श्री आर्यन साळवे श्री विक्रम साळवे व श्री निलेश साळवे यांनी केले आहे. तरी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी वडगाव निंबाळकर परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पंचशील मित्र मंडळ, पंचशील नगर वडगाव निंबाळकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!