बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवाच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न..!


बारामती (दि.७ )

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त बारामतीमध्ये भव्य स्वरूपात जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आज दि. ७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, बारामती यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जयंती उत्सवाचे नियोजन, कार्यक्रमाचे स्वरूप, डेकोरेशन तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत यंदाची जयंती अधिक भव्य आणि आकर्षक पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला. शहरातील विविध भागांमध्ये सजावट, रोषणाई, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार होईल अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत चर्चा झाली. जयंतीच्या दिवशी मिरवणूक, अभिवादन कार्यक्रम, सामाजिक उपक्रम करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

तसेच जयंतीनिमित्त शहरात स्वच्छता, शिस्त आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. जयंती उत्सव हा केवळ उत्सव न राहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण आणि समाजाला दिशा देणारा कार्यक्रम व्हावा, यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन उत्सव यशस्वी करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

या बैठकीमध्ये जुनी समिती बरखास्त करून नवीन समिती तयार करण्यात आली, त्या मधे विनय दामोदर, गणेश सोनवणे, सोमनाथ रणदिवे, बबलू जगताप, प्रा. रमेश मोरे, आनंद लोंढे, गजानन गायकवाड, चंद्रकांत भोसले , चंद्रकांत खरात, सचिन जगताप, विश्वास लोंढे,परिसित चव्हाण,अमोल वाघमारे,कैलास शिंदे, सागर कवडे, अभिलाष भोसले, गौतम शिंदे,शुभम अहिवळे, बाबा पवार, सुशील भोसले, सुरज शिंदे, नवनाथ बल्लाळ, बाबा सोनवणे.

या बैठकीस जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या एकमताने यंदाची आंबेडकर जयंती बारामतीत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!