बारामतीत कंत्राटी कामगारांच्या उपोषणाला तात्पुरती स्थगिती; मागण्यांवर सकारात्मक भूमिका..


  1. बारामतीत कंत्राटी कामगारांच्या उपोषणाला तात्पुरती स्थगिती; मागण्यांवर सकारात्मक भूमिका

बारामती :

बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे यांनी बारामती नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे माननीय अध्यक्ष व जनशक्ती कंत्राटी कामगार संघ यांच्यात सकारात्मक चर्चा पार पडली.

या चर्चेदरम्यान कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका दर्शवली असून संबंधित ठेकेदारास देखील आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कामगारांच्या मागण्यांबाबत योग्य ती दखल घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सध्या सुरू असलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्याची भूमिका घेतली आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण होण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पुढील निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. बा.न.प कडून निवडून देऊन उपोषणास तात्पुरती स्थगिती देण्यात आली, या वेळी नगराध्यक्ष सचिन सातव ,उपनगराध्यक्ष श्वेता नाळे,आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ नगरसेवक राजेंद्र सोनावणे विरोधी पक्ष नेत्या आरती ताई गव्हाळे नगरसेवक अमर धुमाळ नगरसेवक संजय संघयी व सर्व जनशक्ती कंत्राटी कामगार संघटनेचे कंत्राटी कर्मचारी , पदाधिकारी उपस्थित होते.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!