(ता.१)
पंचगणी – नालंदा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर (NIIRC) यांच्या वतीने आयोजित Grand Convocation & Award Ceremony – 2026 हा भव्य सोहळा दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी पंचगणी येथील हॉटेल शिव सागर येथे उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.
या सोहळ्यात Honorary Doctorate (Honoris Causa) तसेच Nalanda Bharat Gaurav Samman – 2026 या प्रतिष्ठित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यावाचस्पती डॉ. मिलिंद बी. भोसुरे (Spiritual & Social Welfare), डॉ.बी.डी.भोसल, डॉ. स्नेहा शिगदाणे (Renowned Gynaecologist) तसेच डॉ. दीपक दादाराव जाधव (Event Coordinator – Nalanda NIIRC University) हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात समाज, शिक्षण, आरोग्य, अध्यात्म आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, व्यवस्थापन आणि उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला.
नालंदा NIIRC युनिव्हर्सिटीच्या या उपक्रमामुळे विविध क्षेत्रातील गुणी व्यक्तींना प्रोत्साहन मिळून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होणार आहे.









