भिगवण मधील मृत महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले. पतीला पोलिसांनी केली अटक…!


बारामती भिगवण रोडवरील (मदनवाडी गावाच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाखाली पाण्यात एका अंदाजे 25 ते 30 वर्षाच्या गरोदर महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने भिगवण परिसरात खळबळ उडाली होती.तिच्या डाव्या हातावर “रविराज”असा टॅटू आढळून आला होता. पोलिसांकडे तो एकच पुरावा होता. त्यावरून अवघ्या २४ तासात खुनाचा उलघडा करण्यात आला.पोलिसांनी आरोपीला २४ तासात अटक केली.रविराज जाधव (रा.आष्टी जि.बीड) असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रविराज हा प्रेमविवाह करून बारामती येथे आपली पत्नी सोनाली रविराज जाधवसोबत राहत होता. पती-पत्नीमध्ये पत्नीच्या अनैतिक संबंधावरून वाद होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. १२ ऑक्टोबरला कडाक्याचे भांडण होऊन रविराजने सोनालीचा ‘खून करून मृतदेह बारामती राशीन रोडवरील मदनवाडी गावाच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाखाली पाण्यात फेकून दिला होता.भिगवण पोलिसांना मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर आरोपी पतीला २४ तासातच अटक केली.सोनाली हिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे.पती रविराज याने याच कारणावरून पत्नी सोनाली हिचा खून केला.त्याच रात्री मृतदेह चादरीत गुंडाळून दुचाकी स्कुटी गाडीवरून बारामतीवरून २७ किलोमीटर अंतरावरील मदनवाडी ओढयात फेकून दिला होता. ओढयाजवळ स्थानिकांना दुर्गंधी जाणवल्यानंतर त्यांनी पुलाखाली जाऊन पाहणी केली असता चादरीत गुंडाळलेला मृतदेह दिसला होता.महिलेच्या हातावर इंग्रजीत रविराज असा टॅटू एवढाच पुरावा होता.

ही कारवाई पुणे पोलीस अधिक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली,अप्पर अधीक्षक गणेश बिराजदार,उपविभागीय पोलीस अधीकारी सुदर्शन राठोड यांच्यासह सहा.पोलीस निरीक्षक विनोद महांगडे,तपास पोलीस अंमलदार गणेश मुळीक,पोलीस अंमलदार महेश उगले आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी केला.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!