संपादक – अनिकेत कांबळे
बारामती (दि.१४). स्व. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त रेणुका नगर रहिवासी संघाच्या वतीने रेणुका नगर, फलटण रोड, कसबा येथे “एक घर – एक झाड” या हरित उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत २५१ देशी वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक घरात किमान एक देशी वृक्ष लावण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमास शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरणभाऊ इंगळे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, साधू बल्लाळ,चिवाशेठ जोजारे, सचिन काकडे, प्रतीक जगताप शुभम पडळकर पै. गणेश आटपडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
हा उपक्रम मा. जनसेवक प्रतिक शिवाजीराव ढवाण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. रेणुका नगर रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष योगेश संजय महाडिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबुलाल शेख, जमीर बागवान, अमीन अन्सारी, रणजित मोतीकर, आशपाक शेख, रफिक शिकलकर, इम्तियाज तांबोळी, अकबर महावीर गायकवाड,तांबोळी,कर्मवीर खन्ना,अमीर शेख शाबीर तांबोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.









