बारामती : (दि.१२) संपादक – अनिकेत कांबळे
बारामती नगर परिषदेची मासिक सर्वसाधारण सभा आज उत्साहात पार पडली. या बैठकीत शहरातील विविध विकासकामे आणि नागरिक सुविधांसह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधत समस्या सोडविण्याची मागणी केली.
महिला नगरसेविका आरतीताई शेंडगे यांची. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या हाताला सलाईन सुरू असतानाही त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत बैठकीला उपस्थिती लावली. आपल्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सभागृहात ठामपणे मांडत त्या चर्चेत सहभागी झाल्या.
त्यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठवला.शहरातील नागरिकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी घरपट्टीत कपात करण्यात यावी तसेच थकबाकीवरील शास्ती (दंड) शंभर टक्के माफ करण्यात यावी.बारामती शहरात पिण्याच्या पाण्यासाठी मीटर बसविण्याच्या निर्णयास विरोध करण्यात आला.ज्या भागात नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही, त्या नागरिकांची पाणीपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.महावितरणच्या डीपीसाठी नगरपालिकेने १५ लाख रुपयांचा खर्च का करावा? असा सवाल उपस्थित करून या खर्चाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली.शहरातील गोरगरीब फळ विक्रेत्यांची अधिकृत नोंदणी होईपर्यंत त्यांना व्यवसाय करण्यापासून रोखू नये, अशी भूमिका मांडण्यात आली.एनडीके कंपनीने वापरलेल्या वाहनांवर नगरपालिकेचा निधी खर्च करू नये, अशा सक्त सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे सभागृहात स्पष्ट करण्यात आले.
विशेष म्हणजे, हाताला सलाईन सुरू असतानाही नागरिकांच्या प्रश्नांसाठी तत्पर राहून विरोधी पक्ष नेत्या आरती शेंडगे या सर्वसाधारण सभेत उपस्थित राहिल्या आणि प्रभागातील विविध प्रश्न आक्रमकपणे मांडले.
आरोग्याची अडचण असतानाही जनतेप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा उपस्थित नगरसेवक आणि नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत, नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी घेतलेली ही धडपड अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
बारामती नगर परिषदेच्या आजच्या सभेत विविध विकासकामांबाबत चर्चा झाली असली, तरी आरतीताई शेंडगे यांनी आजारी असतानाही जनतेच्या प्रश्नांसाठी दाखवलेले समर्पण आणि जिद्द यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.








