बारामती (दि.०५)
बारामती पावसाळ्याच्यापार्श्वभूमीवर बारामती शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये तसेच पावसाचे पाणी साचण्याच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी बारामती नगरपरिषदेत सोमवारी आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आली. बैठकीत नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, ड्रेनेज चेंबर स्वच्छता आणि गाळ काढण्याची कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी शहराती
मुख्यरस्ते व रहदारीच्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापती नवनाथ बल्लाळ यांनी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी शहरातील संभाव्य पूरस्थिती, जलनिकासी व्यवस्था, स्वच्छता आणिआपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नगरपरिषदेने पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यान्वित ठेवले असून नागरिकांनी घाबरून न जाता आबश्यकतेनुसार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.आहे.
बैठकीस मुख्याधिकारी पंकज भुसे, सभापती नवनाथ बल्लाळ, नगरसेवक निलेश इंगुले, आरोग्य विभाग प्रमुख स्वरूप अहिवळे, आपत्ती व्यवस्थापन पथक प्रमुख तथा अग्निशमन अधिकारी पद्मनाभकुल्लरवार, स्वच्छता निरीक्षक अजय लालबिगे, प्रभारी सहाय्यक अग्निशमन अधिकारी निखिल कागडा तसेच आरोग्य विभागातील
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगरपरिषदे कडून आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, स्वच्छता आणि उद्यान विभागातील अधिका यांचे संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले असून नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी त्यांचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






