बारामती : आजाद समाज पार्टीची आढावा बैठक पार पडली..!


बारामती (दि.१)

आज बारामतीत आजाद समाज पार्टीची आढावा बैठक पार पडली असून या बैठकीत आगामी काळातील निवडणुकीवर आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी चर्चा झाली.  मनीष साठे(प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) यांच्या सूचनेनुसार  सौ.मानसी ताई पवार (प्रभारी,महाराष्ट्र राज्य ), श्री.कांतीलालजी ठोकळे (अध्यक्ष,पश्चिम महाराष्ट्र)यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी आजाद समाज पक्ष(कांशीराम) बारामती विधानसभेची महत्त्वपूर्ण बैठक गेस्ट हाउस पाटस रोड या ठिकाणी पार पडली. सदरच्या बैठकीसाठी चंद्रकांत खरात (उपाध्यक्ष,पश्चिम महाराष्ट्र) शाम तेलंगे,मोहन शिलवंत, दिलीप भोसले, प्रफुल्ल वाघमारे,भाळे साहेब, प्रफुल्ल खेडकर, सोमनाथ जगताप, रितेश पवार, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाची ध्येय- धोरणे, कार्यकर्त्यांची कामे, आगामी निवडणुका तसेच विविध पैलूंवर बैठकीमध्ये चर्चा झाली.


12
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!